परंडा / प्रतिनिधी : - 

वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे हे आपल्या भारतीय घटनेचे प्रमूख उद्दिष्ट आहे.असे प्रतिपादन शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.  शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.दीपा सावळे यांनी राष्ट्रीय वैज्ञानिक दिन व डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात अध्यक्षीय समारोप करताना व्यक्त केले.     

महाविद्यालयातील विवेक वाहिनी आणि सांस्कृतिक विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना  यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.शहाजी चंदनशिवे, विवेक वाहिनीचे समन्वयक डॉ.विद्याधर नलवडे ,आई क्यू ए सी चे चेअरमन डॉ.महेशकुमार माने आणि कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा.शंकर अंकुश उपस्थित होते.  या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी  कोव्हीड -१९ चे पालन करत मास्क व सेनिटायजर सह सोशल डिस्टंसिंग चे पालन करत उपस्थित होते.

 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी केले , प्रास्ताविक डॉ.विद्याधर नलवडे यांनी केले.प्रमुख वक्ते प्रा.अंकुश शंकर यांनी आपल्या मनोगतातून वैज्ञानिक जनजागृती कशी केली पाहिजे, वैज्ञानिक दृष्टिकोन कसा निर्माण केला पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे उच्चशिक्षित शिक्षक प्राध्यापक यांनी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण केला पाहिजे तरच आपला देश विकसित होईल अन्यथा अंधश्रद्धेच्या आहारी गेल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळे आपल्या समाजाचे आणि देशाचे खूप मोठे नुकसान होणार आहे. अध्यक्षीय समारोप करताना पुढे प्राचार्या डॉ.दीपा सावळे म्हणाल्या की डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचा खून करण्यात आलेला आहे.त्यांचा खून झाला तरी पण त्यांच्या विचारांचा खून करता येत नाही.त्यांनी देशांमध्ये सर्व जाती धर्मासाठी अनमोल असे कार्य केले आहे.त्यांनी कोणाच्याही श्रद्धा विरुद्ध काम केले नाही.केवळ समाजामध्ये अंधश्रद्धा पसरू नये यासाठी त्यांनी चळवळ उभी केली आणि त्यांचे कार्य काही लोकांना आवडले नाही म्हणून त्यांनी त्यांचा खुन केला.परंतु आज नरेंद्र दाभोळकर जरी आपल्यात नसले तरी त्यांचे विचार आज आपल्या सोबत आहेत तेव्हा सर्वांनी त्यांचे विचार आत्मसात करून त्यांच्या हात्येकरांना कठोर शासन झाले पाहिजे असेही त्यांनी यावेळी आपल्या मनोगतामध्ये सांगितले.शेवटी कार्यक्रमाचे आभार राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ.सचिन चव्हाण यांनी केले .


 
Top