उस्मानाबाद / प्रतिनिधी : -

विद्यार्थीदशेत शिक्षण घेण हे सोप असत मात्र एकदा का आपण एखाद्या व्यवसायात किंवा नोकरीला लागलो की शिक्षण घेऊ वाटत नाही असे प्रतिपादन धनेश्वरी शिक्षण समूहाचे  अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी केले ते कृषि निविष्ठा विक्रेता पदविका अभ्यासक्रम समारोप प्रसंगी बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर कृषि निविष्ठा विक्रेता पदविका अभ्यासक्रमाचे समन्वयक बाबासाहेब पाटील,सहायक संचालक रामेती औरंगाबाद  मेघशाम गुळवे,अधिव्याख्याता जी.एम.फरताडे, डॉ.क्रांतीकुमार पाटील हे उपस्थित होते.या अभ्यासक्रमाचे कृषी महाविद्यालय गडपाटी उस्मानाबाद यांनी आयोजन केले होते.

पुढे बोलताना डॉ.प्रतापसिंह पाटील  म्हणाले की,या कोर्सला प्रवेश घेणारे हे विद्यार्थी नाहीत तर ते प्रत्येक गावातील प्रतिष्ठीत आहेत तसेच त्यांचे शेतकरी सुधारण्यात मोलाचे योगदान आहे.या कोर्सला प्रवेश घेणारे विद्यार्थी हे २२ वयापासून ते ६० वर्षापर्यंतचे होते तरीही त्यांनी अभ्यासक्रम चांगल्या पध्दतीने पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन ही केले.

यावेळी कृषि निविष्ठा विक्रेता पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांमधून प्रताप गाढवे व उदय तीर्थकर यांनी मनोगत व्यक्त केले सुत्रसंचलन प्रा.के.डी.बंडे आभार प्रा.दिनेश सुतार यांनी मानले.

कृषि निविष्ठा विक्रेता पदविका अभ्यासक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा.हरी घाडगे,दत्तात्रय घावटे,राम सुतार,महेबुब  मुजावर यांनी परिश्रम घेतले.


 
Top