वाशी / प्रतिनिधी- 

 छत्रपती शिवाजी विद्यालय वाशी येथे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS ) परीक्षेमध्ये शिष्यवृत्तीधारक झालेली कुमारी शेंडगे अंकिता रामेश्वर या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला.

 यावेळी कुमारी शेंडगे अंकिता रामेश्वर हिचे आई-वडील ,चुलते- चुलती व भाऊ यांच्या समवेत शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री. कांबळे पी.ए. व सर्व शिक्षक शिक्षिका यांच्या तर्फे शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अंकीताचा सत्कार करण्यात आला. तसेच या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे श्री कांबळे बी.डी. ,श्री क्षीरसागर एस व्ही., श्रीमती बावकर एस.बी.श्रीमती मुळे टी सी  यांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या  प्रसंगी कुमारी शेंडगे अंकिता रामेश्वर हिने आपले मनोगत व्यक्त केले. तसेच कांबळे बी. डी. सर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री धारकर एस .एस. तर आभार प्रदर्शन श्री सावंत बी. एम. यांनी केले.


 
Top