उस्मानाबाद /प्रतिनिधी

धनुष्यबाण हे अर्जुनाचे अस्त्र आहे त्यापासुन फक्त कौरवांना धोका , राज्यात तर 105 कौरव आहेत त्याला फक्त धनुष्यबाणच रोखणार असे ट्विट शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर व जिल्हाप्रमुख आमदार कैलास पाटील यांनी केले आहे. भाजप आमदार यांना कैलास पाटील यांनी कौरवांची उपमा दिली असून त्याला शिवसेनेचा धनुष्यबाणच रोखणार असे सांगत हल्लाबोल केला आहे. तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी ट्विट करून शिवसेनेवर टीका केल्यानंतर आमदार पाटील यांनी त्याला प्रतिउत्तर दिले आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केल्यानंतर राज्यभरात भाजप शिवसेना वाद पेटला असून आरोप प्रत्यारोप होत आहेत.जगाला तालिबान पासून आणि महाराष्ट्राला धनुष्यबाण पासून खरा धोका आहे असे ट्विट भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी केले आहे. आमदार पाटील यांनी राणे यांच्या अटकेचा निषेध ट्विट करून केला आहे त्या ट्विटला शिवसेनेने उत्तर दिले आहे.

 
Top