उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

ऑनलाइन पद्धतीने फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. मुरुम येथील शिक्षक खंडाप्पा कंटेकुरे यांच्याशी जवळीक साधून त्यांना महागड्या भेट वस्तूंचे आमिष दाखवून त्यांची एकूण ४५ लाख ४२ हजारांची फसवणूक केली होती.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच खंडाप्पा यांनी आत्महत्या केली होती. याप्रकरणी सायबर क्राइम ठाण्याच्या पोलिस निरीक्षक अर्चना पाटील यांनी तपास केला. यामध्ये मयंक मनोहरलाल शर्मा (मुळ रा. जिल्हा गोरखपूर, उत्तर प्रदेश) यास अटक केली.उस्मानाबाद येथील मिल्ली कॉलनीतील अब्दुल हमीद शेख यांनी फेसबुकवर जुनी बुलेट मोटारसायकलची जाहिरात दाखवून ५७ हजारांची फसवणूक केली. यामध्ये राजस्थानातील अलवार जिल्ह्यातील प्रदीप मगन मीना याला अटक केली.


 
Top