परंडा /प्रतिनिधी :-

 पक्ष वाढीच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीच्या तालुका कार्यकारीणीमध्ये वाढ करण्यात येत असुन भाजपा तालुका सरचिटणीस पदी सिरसांव येथील ग्रा.पं. सदस्य रामेश्वर चोबे, तालुका चिटणीस पदी वडणेर येथील सुजितसिंह परदेशी, भाजपा तालुका उपाध्यक्ष म्हणुन रवी गरड, व नारायण चांगदेव कोलते, (रोहकल) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पक्ष बळकट करणे, पक्षाचा विस्तार करणे, बुथ रचना बांधणी, केंद्र सरकारच्या लोकाभिमुख योजना तळागाळापर्यंत पोहचवणे, पक्षाची ध्येय धोरणानुसार काम करणे यासाठी हा विस्तार झाल्याची माहीती भाजपा परंडा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील यांनी दिली.

नवनियुक्त पदाधिकारी यांचे जिल्हा संघटण चिटणीस  रामचंद्र (विकास) कुलकर्णी, विधी आघाडीचे जिल्हा संयोजक तथा कृ.उ.बां.चे सभापती ॲड. संतोष सुर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव टोंपे, जिल्हा चिटणीस ॲड. गणेश खरसडे, परंडा न.प. गटनेते  सुबोधसिंह ठाकूर, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश चिटणीस ॲड. जहीर चौधरी, ॲड. भालचंद्र औसरे, राजाभाऊ चौधरी, अजित पाटील, सरचिटणीस विठ्ठल तिपाले यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

 
Top