तुळजापूर / प्रतिनिधी-

 येथील  श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानचा वतीने देविस भाविकभक्तांनी नवस व  श्रध्देपोटी अर्पण केलेल्या सुमारे पंचवीस हजार वस्ञ कोकणातील पुरग्रस्तांचा मदतीसाठी दोन ट्रक मधुन सोमवार दि. २३ रोजी राञी  रवाना झाल्या .

 प्रथमता सहावार नऊ साड्यांचे गठ्ठे एकञित बांधुन ते ट्रक मध्ये ठेवण्यात आले. नंतर सोमवारी सांयकाळी या ट्रकची विधीवत पुजा मंदीर संस्थानच्या प्रशासकीय व्यवस्थापक तथा तहसिलदार योगिता कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर या ट्रक चिपळुन  महाडकडे रवाना झाल्या. या साड्या तेथील प्रांत अधिकाऱ्यांनकडे सपूर्द केली  असुन नंतर ते गरजु महिलांना वाटप करणार असल्याचे मंदीर समिती सुञाने सांगितले.

यावेळी धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुल, राष्ट्रवादी काँग्रेसचे गोकुळ शिंदे व त्यांचे सहकारी तसेच जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे, विश्वास परमेश्वर,  बाळासाहेब भुसारे, रवि गायकवाड, गणेश नाईकवाडी उपस्थितीत होते.


 
Top