उस्मानाबाद / प्रतिनिधी : - 

शहरातील तेरणा पब्लिक स्कूलचा सीबीएसई १० वी बोर्ड परिक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून शाळेतील पृथ्वीराज सुभाष कदम व सूर्यांजी माने ९७ टक्के गुण घेऊन अनुक्रमे शाळेतून व जिल्हयातून प्रथम आले आहेत.

शाळेतील ९५ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यापैंकी २० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यापेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. पृथ्वीराज सुभाष कदम व सूर्यांजी माने (९७.0 टक्के ), अश्विन जगताप (९४. ८ टक्के ), ऋषीकेश देशमुख (९४.६ टक्के ),गायत्री पाटील (९४.६ टक्के ),दिक्षा वाघमारे (९४.४ टक्के ), श्रुती पाटील (९४.२ टक्के ), तुषार राख (९४. ० टक्के ), हर्षवर्धन जाधव (९३.६ टक्के ), ज्ञानेश्वरी मारकड (९३. ० टक्के ), सुमित अंधारे (९२.४ टक्के ), स्वाती शिराळकर (९२.४ टक्के ), अंकिता नलावडे (९२.२ टक्के ), सानिका पाटील (९२.0 टक्के ), आदित्य आदटराव (९१.६ टक्के), साहिल मोरे (९१.४ टक्के ), सफी पटेल (९१.४ टक्के ), कुलदिप शिंदे (९१.२ टक्के ), केशव नवले (९१.२ टक्के ), अक्षय धुमाळ (९0. 0 टक्के ) या प्रमाणे विद्यार्थ्यांने गुण प्राप्त केले आहेत. 

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष एल.एल.पाटील, सचिव अनंतराव उंबरे, संचालक मंडळ, प्राचार्य, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले आहे. 

 

 
Top