तुळजापुर / प्रतिनिधी- 

 येथिल मंगळवार पेठ रस्त्यावर  असणाऱ्या  तहसिल कार्यालया समोर  सतत असणा-या बेशिस्त पार्किंगमुळे पादचारी नागरीकांना जिव मुठीत घेऊन चालावे लागत होते. बेशिस्त पार्किंगमुळे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत असल्याने नगर परिषद प्रशासनाने  (दि. २) रोजी दुपारी तहसिल कार्यालयासमोरील गाड्या ताब्यात  घेवुन रस्ता पादचारी मंडळीसाठी खुला केला ब-याच दिवसानंतर मंगळवार पेठ रस्त्याने मोकळा श्वास घेतला होता.

मगळवार पेठ रस्त्यावर तहसिल कार्यालय, नगरपरिषद, पोलिस ठाण्यासह सह अन्य कार्यालये असल्याने हा रस्ता सुट्टीचा दिवस वगळता वाहनांची दुर्तफ रांगा लागत होत्या. पादचा-यांना चालणे मुष्कील बनले होत. अखेर या रस्त्यावर असणारे वाहने हटवल्याने हा रस्ता अखेर मोकळा झाला. हा रस्ता कायमस्वरुपी मोकळा राहण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

 

 
Top