तुळजापूर / प्रतिनिधी-

तालुक्यातील जळकोट  येथे रेशन कार्ड समस्या निवारण शिबिरास  मंगळवार दि.२४ रोजी आरंभ झाला याचा सांगता बुधवार दि. 25 रोजी समारोप होणार  आहे.

तुळजापूर तालुक्यातील मंडळ विभाग जळकोट येथे तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे, पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार संदिप जाधव, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, जळकोटचे सरपंच अशोकराव कदम ,  ग्रामपंचायत सदस्य व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत सरस्वती पूजन करून शुभारंभ करण्यात आला.      

आज प्रथम दिनी साठ जणांनी रैशनकार्ड संदर्भात अर्ज केले. तत्पुर्वी  तहसीलदार तांदळे यांना शासनाचा उत्कृष्ठ तहसीलदार पुरस्कार भेटल्याबद्दल जळकोटवासियांतर्फे जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, सरपंच अशोकराव कदम यांच्या हस्ते फेटा, शाल, पुष्पहार, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.  प्रास्ताविक पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार संदिप जाधव यांनी केले. याप्रसंगी रेशन दुकानदार यांच्यावतीने तहसीलदार तांदळे व नायब तहसीलदार जाधव यांचा सत्कार करण्यात आला.

 याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र कदम, प्रशांत नवगिरे, बसवराज कवठे, संजय माने, मंडळ अधिकारी पी. एस. भोकरे, नळदुर्गचे मंडळ अधिकारी गांधले, जळकोट सज्जाचे तलाठी तात्यासाहेब रूपनवर, जोगदंड, जयराज कुलकर्णी, पुरवठा विभागाचे अव्वल कारकून जी. एस. पवार, महसूल सहायक कानडे, अंकुश जाधव, बाळू सोनवणे, सुरेश वाघमारे, रेशन दुकानदार महेश कदम, बसवराज स्वन्ने, विठ्ठल कदम, सौ. उज्ज्वला भोगे, बसवंत भोगे, मिनाक्षी किलजे, कोतवाल अशोक दुधभाते, कुमारी जमादार आदींसह जळकोट, जळकोटवाडी , बोरगाव, नंदगाव, लोहगाव, सलगरा ( मड्डी ), सिंदगाव, कुन्सावळी, बोळेगाव, गुजनूर, शहापूर आदी गावचे रेशन दुकानदार, नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. आभार महेश कदम यांनी मानले.

 
Top