तुळजापूर / प्रतिनिधी-
स्थानिक स्वराज्य संस्थेचे मा आमदार सुरेश धस पाटील यांनी नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 3 तुळजापूर (खुर्द) शाळेला भेट देवुन पाहणी केल्यानंतर शाळेचा गुणवत्तेचा दर्जाचे कौतुक करुन शाळेस सुमारे 20 लाख रुपये निधी देण्याचे आश्वासन दिले.
उस्मानाबाद ,बीड ,लातूर स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार मा. सुरेश धस पाटील साहेब यांनी नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 3 तुळजापूर खुर्द शाळेला भेट देऊन शाळेतील संगणक प्रयोगशाळा, विज्ञान प्रयोगशाळा ,सेंद्रिय खत, गांडूळ खत परसबाग या उपक्रमांना भेटी देऊन इंटरॅक्टिव बोर्ड वरती ऑनलाईन शिक्षण याची पाहणी करून आणि शाळेच्या गुणवत्तेचा आढावा घेतला मराठवाड्यातील गुणवत्तेत सर्वप्रथम असणाऱ्या नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 3तुळजापूर (खुर्द) शाळेचे नाव या अगोदर खूप ऐकून होतो परंतु शाळेला आज भेट देण्याचा योग आला.
नगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा गुणवत्ते अभावी बंद पडण्याच्या मार्गावर असताना तुळजापूर नगरपालिकेच्या शाळा क्रमांक 3 या शाळेला भेट दिल्याचे सार्थक झाले तुळजापूर ची ही मॉडेल शाळा पाहिल्या नंतर बीड जिल्ह्यामध्ये अशा धर्तीवर नगर पालिकेच्या शाळा आपण स्थापन करणार असल्याची ही माहिती मा.आमदार यांनी दिली या शाळेतील अनेक विद्यार्थी प्राथमिक शिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनीअर,वकील,प्राध्यापक, शिक्षक या विविध क्षेत्रांमध्ये आपले नाव चमकवत असल्याची ही माहिती मिळाली. शाळेची गुणवत्ता पाहून 2008-2009,2009-10 औरंगाबाद विभागातील गुणवत्तेत उत्कृष्ट शाळा, 2015 मराठवाड्यातील पहिली ISO शाळा अशी मराठवाड्यात गुणवंत नगरपालिकेची शाळा प्रथमच पाहिली असा गौरवोद्गारही काढले.शाळेच्या प्रमुख अडचणीपैकी एक अडचण विद्यार्यांच्या वाढत्या संख्येमुळे शाळेची इमारत कमी पडत असल्या कारणाने शाळेची इमारत बांधकामासाठी तातडीने 20 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी नगराध्यक्ष श्री. सचिन रोचकरी ,मुख्याधिकारी श्री. लक्ष्मण राठोड ,युवा नेतेश्री.विनोद गंगणे भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. अँड . नितीन काळे नगरसेवक श्री.पंडितराव जगदाळे, सौ.मंजुषा ताई देशमाने, श्री.विजय कंदले,श्री.चंद्रकांत कणे,. सचिन पाटील ,श्री.किशोर साठे,श्री.सुनील रोचकरी,श्री.नागेश नाईक, श्री.विशाल रोचकरी,श्री.अविनाश गंगणे,श्री.सुहास साळुंके,श्री.गुलचंद व्यवहारे नगर परिषद कार्यालयीन अधीक्षक श्री. वैभव पाठक उपस्थित होते.
नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 3 तुळजापूर(खुर्द)शाळेचे मुख्याध्यापक श्री. तुकाराम मोटे, सहशिक्षक श्री.अशोक शेंडगे ,श्री. बालाजी साळुंके ,श्री.विश्वजीत निडवंचे ,सहशिक्षिका श्रीम.निता गायकवाड श्रीम.निर्मला कुलकर्णी श्रीम. यास्मिन सय्यद या सर्व शिक्षकांचे कौतुक केले.