कळंब  / प्रतिनिधी-

माझी आई ही अशिक्षित होती परंतु तिच्या ओव्या ह्या पहाटे सकाळी उठल्यापासून कानावर पडत आई ही चालते बोलते ज्ञानपीठ होते. त्यामुळेच आज मी घडलो आहे असे हृद्यस्पर्शी उदगार डी.के.कुलकर्णी यांनी दिनांक २१ ऑगस्ट रोजी शहरातील साई मंगलम या सभाग्रहात केले.

डी.के.कुलकर्णी यांच्या एकहत्तरीनिमित्त त्यांचा ग्रंथतुला,शर्करा तुला व गुळतुला व सत्कार समारंभाचे विविध संघटना,कुटूंबिय व मित्रपरिवाऱ्यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी डी.के.कुलकर्णी यांच्या कार्याचा गौरव करणारा सा.साक्षी पावनज्योत विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

पुढे बोलताना डी.के.कुलकर्णी म्हणाले की, माझे ७१ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विविध संघटना व कुटुंबाच्या व मित्रपरिवाराच्या वतीने सत्कार केला. हे मिळालेले प्रेम दोन्ही हाताने न झेपणारे असून माझी झोळी दुबळी झाली आहे.या संपूर्ण आयुष्याचा जडणघडणीत आई वडिलांची पुण्याई कामाला आली आहे.हे संस्कार शिक्षक म्हणून व समाजकार्यात उपयोगी पडले. अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला,ज्येष्ठ नागरिक संघ तसेच ज्ञान प्रसारक मंडळ या संस्थांमधून काम करीत असताना सर्वांचे सहकार्य  व प्रेम मिळत राहिले.यामुळेच ही उंची गाठता आली. सत्कारास उत्तर देताना आपली भावना व्यक्त केली.

 या कार्यक्रमात मुख्याध्यापक संघाच्या व ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने डी.के.कुलकर्णी सरांचा शाल,श्रीफळ, सन्मानपत्र,पुष्पहार देवून संघाचे मानद अध्यक्ष शिक्षण तज्ञ एम.डी.देशमुख, जिल्हाध्यक्ष सुरेश टेकाळे व सदस्य तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष डॉ.बी.आर.पाटील,तालुकाध्यक्ष ह.भ.प.महादेव महाराज आडसूळ व सदस्य यांनी सत्कार केला. याप्रसंगी  मुख्याध्यापक संघाचे मानद अध्यक्ष एम.डी. देशमुख यांनी डी. के.कुलकर्णी सरांच्या कार्याचा गौरव केला.व खालील कवितेतून त्यांच्या कार्याची महती सांगितली .

घर असावे घरासारखे

नसाव्यात नुसत्या भिंती !!धृ!!

तेथे असावा प्रेम जिव्हाळा 

नसावे नुसती नाती !!१!! 

या कार्यक्रमात अप्पाराव कुलकर्णी. चैतन्य सत्संग मंडळ लातूर, प्रा.श्रीहरी वेदपाठक प्रवचनकार, डॉ. बी.आर.पाटील, अ.भा.साने गुरूजी कथामालेचे अध्यक्ष सुनील पुजारी, ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळ्याचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर,सोलापूर जनता बँकेचे माजी संचालक उद्धवराव सरकाळे,प्राचार्य सूर्यकांत जगदाळे,अशोकराव कुलकर्णी, महादेव महाराज आडसुळ,बालाजी तांबे,जयश्री कुलकर्णी,उपनगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी मनोगत व्यक्त केली.

या कार्यक्रमास सागर मुंडे, सुरेश टेकाळे, प्रभाकर कापसे, प्राचार्य डॉ.सुनिल पवार, प्रा.डॉ.संजय कांबळे, बिरदीचंद बलाई, बंडूपंथ दशरथ, डॉ.रामकृष्ण लोंढे,दिलीपराव पाटील यांची उपस्थिती होती. या वेळी चैतन्य महाराज देगलूरकर यांचा संदेश रामराजे महाराज राक्षसभुवनकर यांनी वाचून दाखवला.मानपत्राचे वाचन अँड. त्र्यंबकराव मनगिरे व साहित्यिक राजेंद्र अत्रे यांनी वाचन केले.  या कार्यक्रमात स्वागत गीत आकाशवाणी गायिका केतकी देशपांडे यांनी तर प्रास्ताविक जयंत कुलकर्णी,सूत्रसंचालन शितल कुलकर्णी तर आभार डॉ.गिरीश कुलकर्णी यांनी मानले.

 
Top