उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यात प्रामुख्याने बार्शी रोड सिंदफळ ते शिराढोण रस्ता रु. ०५.७० कोटी, मुद्ग्लेश्वर परिसर विकास रु.१० लक्ष, पशु वैद्यकीय दवाखाना इमारत बांधणे रु. ३५ लक्ष, दलित वस्तीत विद्युतीकरण व सिमेंट काँक्रीट रस्ता रु.४.७५ लक्ष, १५ व्या वित्त आयोगातील निधीतील विकासकामे रु.१६ लक्ष, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सार्वजनिक शौचालय रु.०३ लक्ष आदी विकासकामांचे गावातील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. तसेच लोकसहभागातून रस्त्याच्या दुतर्फी वृक्ष लागवडीची सुरुवात केली.

गावाच्या विकास कामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल गावकऱ्यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा सत्कार केला. यापुढे देखील गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे याप्रसंगी आवर्जून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.अस्मिताताई कांबळे, तालुकाध्यक्ष श्री.संतोष बोबडे, पं.स.सभापती श्री.इंगोले, उपसभापती श्री.दत्तात्रय शिंदे, श्री.विक्रमसिंह देशमुख, श्री.विनोद गंगणे, श्री.सज्जन साळुंके, श्री.पिंटू मुळे, श्री.शरद जमदाडे, श्री.सिद्धेश्वर कोरे, श्री.अण्णा सरडे, श्री.यशवंत लोंढे, श्री.आनंद कंदले, तसेच सरपंच ॲड.अर्जुन कापसे, उपसरपंच सौ.पूनम ठोंबरे, माजी सरपंच श्री.शिवाजी खुंटाफळे, माजी उपसरपंच श्री.अभिजित धनके, माजी उपसरपंच श्री.सुदर्शन पांढरे, ग्रा.पं.सदस्य श्री.हनुमंत जाधव, श्री.बाळासाहेब डोंगरे, श्री.गणेश धनके, श्री.मनोज गायकवाड, श्री.याकूब इनामदार, श्री.दिनेश भोजने, श्री.उमेश माळी, क्रांती धनके यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.

 
Top