लोहारा/प्रतिनिधी

उस्मानाबाद- बीड-लातुर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे आ.सुरेश धस यांनी लोहारा नगरपंचायत कार्यालयात आढावा बैठक घेतली. 

लोहारा नगर पंचायतकडे दाखल करण्यात आलेले रमाई आवास योजना व इतर घरकुल योजनेचे प्रलंबित सर्व प्रस्ताव तात्काळ प्रधानमंत्री आवास योजनेसाठी मागवून घेऊन त्यांना तात्काळ घरकुलाचा लाभ देण्यात यावा, तसेच शहराला कायमस्वरूपी पाणी पुरवठा करण्यासाठी प्रस्ताव व तांत्रिक अडचणी बाबत निवेदन द्या, मी स्वतः लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावणार, रोहयो मधून शेतकऱ्यांना विहीर, शेत तलाव यासह विविध योजनांचा लाभ द्या, अशा सुचना आ.सुरेश धस यांनी बैठकीत दिल्या. 

यावेळी नगरपंचायत मुख्याधिकारी गजानन शिंदे, कार्यालय अधीक्षक जगदीश सोंडगे, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, भाजपा जिल्हा सरचिटणीस माधव पवार, भाजपा लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, पं.स.सदस्य वामन डावरे, माजी नगरसेवक आयुब अब्दुल शेख, दिपक मुळे, जि.चिटणीस विक्रांत संगशेट्टी, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, शिवशंकर हत्तरगे, नेताजी शिंदे, भाजपा तालुका उपाध्यक्ष प्रशांत माळवदकर, प्रशांत काळे, बालाजी चव्हाण, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी सोनटक्के, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दगडू तिगाडे, दादा भाई मुल्ला, कल्याण ढगे, मल्लिनाथ फावडे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top