उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 तालुक्यात अंबेजवळगा येथील प्रितम राजाभाऊ साबळे यांच्या खून प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. साबळे यांचा झेंडा लावण्याच्या कारणावरून खून झाला होता. यातील आरोपी फरार झाले होते. उस्मानाबाद ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय सुरवसे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिंदे, किशोर रोकडे, हवालदार चौधरी, कांबळे, खंदारे, पोलिस नाईक वाघमारे, भातलवंडे यांचे पथक त्यांच्या मागावर होते. े भडाचिवाडी शेत शिवारात आरोपी लपून असल्याची माहिती मिळताच पथकाने भडाचिवाडी शिवारात सापळा रचून आरोपी सूरज शेषेराव चांदणे, पवन शेषेराव चांदणे, तेजस कृष्णा चांदणे, सौरभ सत्यवान चांदणे यांना शुक्रवारी अटक केली.


 
Top