उस्मानाबाद / प्रतिनिधी-

केंद्र शासनाच्या आयकर विभागामार्फत,राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागी तसेच प्राविण्यधारक खेळाडुंकरिता विविध पदांच्या खेळाडू भरतीचा कार्यक्रम प्रसिध्द झाला आहे.भारतीय शालेय खेळ महासंघाने आयोजित केलेल्या,शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत,महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू पात्र ठरणार आहेत.या भरतीकरिता पात्र खेळाडुंना,शालेय राष्ट्रीय स्पर्धेमधील कामगिरी संचालनालयामार्फत प्रमाणित करुन देण्यात येणार आहे.

 राज्यातील कोविड-19 विषाणुंच्या प्रादुर्भावाचा विचार करता,खेळाडुंनी पुणे येथे व्यक्तीश:उपस्थित राहणे धोक्याचे ठरु शकते.राज्यातील शालेय राष्ट्रीय स्पर्धेतील सहभागी खेळाडुंनी,विहित नमुन्यामधील फॉर्म-4 प्रमाणित करुन घेण्यासाठी अर्ज दि.20 ऑगस्ट 2021 पर्यंत आपल्या जिल्हयातील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावेत,त्यानंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.याची दक्षता घ्यावी,असे आवाहन क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त ओम बकोरिया यांनी केले आहे.


 
Top