उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

एसटी महामंडळाचे उत्पंन्न वाढवा व खर्चात बचत करा, अशा प्रकारची सूचना, राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  शेखर चन्ने यांनी एसटी महामंडळाच्या सर्व अधिकाऱ्यांना दिल्या. 

आज दि.22 जुलै रोजी  राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  शेखर चन्ने यांनी उस्मानाबाद शहरातील सर्कीट हाऊस येथे एसटी महामंडळाच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली.यावेळी ते बोलत होते. या  बैठकीस उपमहाव्यवस्थापक नियंत्रण समिती क्रमांक दोन  श्री देवधर,  विभाग नियंत्रक ताम्हणकर ,  विभागीय वाहतूक अधिकारी श्री जानराव,  सुरक्षा व दक्षता अधिकारी श्री जाधव,  उप यंत्र अभियंता श्री दिलीप जाधव  व विभागीय लेखा अधिकारी श्री राजकुमार दहिहंडे व उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व आगार प्रमुख उपस्थित होते.

 या बैकीत त्यांनी  एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी तसेच खर्चामध्ये बचत करण्यासाठी मार्गदर्शन केले तसेच सरकार जास्त दिवस एसटी महामंडळाला अर्थसहाय्य करू शकणार नाही ,त्यासाठी आपण आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे ,नवनवीन सोर्सेस बघितले पाहिजे. आणि आपले  उत्पन्न वाढवण्या बद्दलचे मार्गदर्शन केले. 

नवीन बस सुरू करण्यासाठी निवेदन 

भुम आगारातील विविध समस्या  व भुमहुन नविन बसेस सुरू करण्याच्या मागणीचे  निवेदन  राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष श्री शेखरजी चन्ने  यांना देण्यात आले. यावेळी भाजपा जेष्ट नेते बाळासाहेब क्षिरसागर,  संतोष औताडे, भुम तालुका प्रवांशी संघटना अध्यक्ष अरविदँ शिंदे आदींची उपस्थिती होती. 

 
Top