उस्मानाबाद / प्रतिनिधी-

सोलापूर येथे आमदार गोपीचंद पडळकर यांचे गाडीवर दगड फेक करीत समाजकंटकाकडून झालेल्या भ्याड हल्याचा उस्मानाबादेत जाहीर निषेध करून या हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी व अन्य विविध मांगण्या ओबीसी राजकीय आरक्षण बचाव समिती, उस्मानाबादच्या वतीने जिलाधिकाऱ्यांकडे दि. ५ जुलै रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

निवेदनात नमुद करण्यात आले आहे की,  आ. गोपीचंद पडळकर हे सोलापूर येथे ओबीसी व्हीजेएनटी यांचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे घोंगडी बैठकीस आले असता - त्यांच्या गाडीवर सोलापूर येथील समाजकंटकानी दि. ३० जुन २०२१ रोजी दगडफेक करून करून भ्याड हल्ला केला.  या  हल्लेखोरांवर कडक शासन करने, ओबीसी व्हीजेएनटी यांचे राजकीय पुर्ववत ठेवाव,  जो पर्यंत ओबीसी-व्हीजेएनटी यांचे राजकीय पूर्ववत होत नाही तोपर्यंत कोणत्याही निवडणूका घेवू नयेत, ओबीसी-व्हीजेएनटीच्या शासकीय कर्मचा-यांचे नौकरी मधील पदोन्नती देण्याचे काम पुर्वी प्रमाणे   कायम ठेवावे, ओबीसी व्हीजेएनटी यांचे जातनिहाय सर्वेक्षण व जनगणना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर लक्ष्मण माने, अॅड. खंडेराव चौरे, शिवानंद कथले, रवि कोरे, महादेव माळी, पिराजी मंजुळे, पांडूरंग लाटे, नितीन शेरखाने, इंद्रजीत देवकते, प्रमोद बचाटे, दत्तात्रय सोनटक्के आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 


 
Top