उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

टोकीओ ऑलिम्पिक-2021 मध्ये भारतीय संघात महाराष्ट्रातील10 खेळाडुंची निवड झाल्याबद्दल 23 जुलै,2021 रोजी श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम उस्मानाबाद येथे खेळाडूंना  शुभेच्छा देणा-या फ्लेक्सचे  व सेल्फी पॉईंटसह स्वाक्षरी मोहिमेचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीमती रुपाली आवळे  यांचे हस्ते  करून शुभेच्छा देण्यात आल्या. 

 यावेळी आंतरराष्ट्रीय खो-खो खेळाडू कु.निकीता पवार यांना अतिरिक्त जिल्हाधिकारी यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीमती रुपाली आवळे यांनी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंना उत्कृष्ट कामगिरीसाठी व जास्तीत जास्त पदके भारताला प्राप्त करण्यासाठी खेळाडुंना शुभेच्छा दिल्या.यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, तालुका क्रीडा अधिकारी श्रीमती सारिका काळे, क्रीडा अधिकारी श्री कैलास लटके यांच्यासह सर्व कर्मचारी वर्ग यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. 
Top