तुळजापुर/ प्रतिनिधी-

 महाराष्ट्रात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या महाविकास आघाडीची सत्ता येवुन आज दिड वर्ष होत आले तरीही जिल्हयात अजुनही  कुठल्याही महामंडळ शासकीय समित्यांनवर  सदस्य म्हणून  पदाधिकारी कार्यकत्यांच्या नियुक्त्या न झाल्याने काँग्रेस कार्यकत्यांन मधुन नाराजी व्यक्त केली जात आहे.

भाजपा सेनेची सत्ता येताच मुखमंञी देवेंद्र फडणवीस ने भाजपा पदाधिकारी कार्यकते यांची नेमणुक करुन त्यांना सन्मान दिल्याने पक्ष पदाधिकारी कार्यकते पक्षाचे काम जोमाने करीत होते. माञ सत्ता गेल्याने अनेक महामंडळ समित्या नियुक्त्या महाविकासआघाडी सरकारने केल्या विशेष म्हणजे अजुन ही महत्त्वाचा समित्यांनवर भाजपा पदाधिकारी कार्यकते जेसे थे आहेत हे महाविकासआघाडी नेत्यांना कसे दिसत नाही सध्या महाविकासआघाडी नेते ऐकमेकाचा विरोधात बालत आहे आरक्षण महागाई समस्या वाढत आहे महाविकासआघाडी सरकारचा कारभार असाच चालु राहिला तर माञ  पुढील काळ,चांगला असणार नाही परिस्थिती अशीच राहिला तर माञ  भाजपा स्वबळावर सत्तेवर येईल अशी प्रतिक्रिया  काँग्रेस चे कार्यकते साहेबराव जाधव यांनी प्रसिध्दी पञक काढुन दिली.

 
Top