उस्मानाबाद / प्रतिनिधी - 

शहरातील फडकुले प्लॉट सन ११५/१ मध्ये हिंदू हृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची कमान उभारण्याचा  ठराव नगर परिषदेने दि.२४ एप्रिल रोजी पारित करून त्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे या भागात येत्या चार महिन्यात हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नगर या नावाची नगर परिषद कमान उभारणार आहे.

यासाठी शिवसेनेचे उपप्रमुख प्रशांत बिभीषण साळुंके यांनी नगर परिषदकडे या भागास अधिकृतपणे हिंदूहृदय सम्राट  बाळासाहेब ठाकरे नगर नाव देऊन त्या नावाची नगरपरिषदेने या भागात कमान उभी करावी अशी मागणी केली होती. त्याबाबत त्यांनी सतत आमदार कैलास पाटील, खासदार  ओमप्रकाशराजे निंबाळकर, उपनगराध्यक्ष सुरज साळुंखे यांच्याकडे व  सर्व नगरसेवकांसह नगराध्यक्ष यांना ठराव पारित करण्याची विनंती करण्याबरोबरच त्यासाठी वारंवार पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून  दि.२४ एप्रिल रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत ऐनवेळचा विषय क्रमांक १ बाळासाहेब ठाकरे नगर फडकुले प्लॉट सर्वे नंबर ११५/१ मधील भागास बाळासाहेब ठाकरे नगर या नावाचा ठराव मंजूर असून या भागाच्या सुरुवातीस  हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नगर नावाची कमान मंजुरीसाठी ठराव मंजूर करावा असा प्रस्ताव ठेवण्यात आला.  तो ठराव सर्वसंमतीने पारित करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात आली.

हा ठराव पारित केल्याबद्दल शिवसेना शहर उपप्रमुख बापू साळुंखे यांनी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. कैलास पाटील, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक सुरज साळुंके, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळक  यांच्यासह सर्व नगरसेवक यांचे आभार मानले आहेत.

 
Top