उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 यंदा मृगानंतर आर्द्रा, पुनर्वसु नक्षत्रात अधूनमधून झालेल्या रिमझिम पावसाने काही भागातील पिकांना आधार मिळाला अाहे. अाठ दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे साेयाबीनसह मुग, उडीद, तूर अादी पिकांवर जाळ्यांचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येत अाहे. यामुळे शेतकऱ्यांना फवारणीसाठी महागड्या कीटकनाशकाचा वापर करावा लागत अाहे. यामुळे शेतकऱ्यांना अार्थिक भूर्दंड सहन करावा लागत अाहे.

जिल्हयात सोयाबीनची पेरणी ९८ टक्के भागात झाली  असून बहुतांश शेती कोरडवाहू अाहे. यामुळे निसर्गाच्या भरवश्यावर शेतकऱ्यांचे वार्षिक गणित अवलंबून असते. तालुक्यात मृग, आर्द्रा नक्षत्रात बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी केली तर काही शेतकऱ्यांनी पुनर्वसू नक्षत्रात पेरणी केली. काही दिवस पावसाने अाेढ दिल्याने जाेमात अालेली पीक दुपारी काेमेजत हाेती. मात्र, अाठ दिवसांपासून वातावरण बदलले असून काही भागात कमी अधिक पाऊस झाला अाहे.

मात्र, सतत ढगाळ वातावरण राहत असल्याने सर्वच पिकांवर राेगाचा प्रादुर्भाव हाेत अाहे. काही भागात साेयाबीनवर अाढ्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. दोन दिवसात तालुक्यात सर्वदूर भागात पाऊस झाल्याने खरिपातील पिकांना थोडा आधार झाला आहे. मृगातील पेरणी झालेली पिके चांगल्या स्थितीत असल्याने पिकांत कोळपणी, खुरपणीची कामे सुरू अाहेत. अाठ दिवसांपासून ढगाळ वातावरण व रिमझिम पावसामुळे सोयाबीन, उडीद, मुग या पिकांवर कीड रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. तालुक्यात सोयाबीनसह अन्य पिके बहरात असली अाहेत. मात्र, त्या पिकांना अाता रोगाने झपाटल्याने शेतकरी पदरमोड करून महागडे औषधाची फवारणी करत आहेत.

 
Top