परंडा / प्रतिनिधी  -

परंडा तालुक्यातील भारतीय जनता पार्टी जिल्हा पदाधिकारी सर्व तालुका पदाधिकारी सर्व आघाडी व मोर्चाचे मंडलाध्यक्ष व शक्ती केंद्र प्रमुख यांची महत्वपूर्ण बैठक आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या संपर्क कार्यालय परंडा, येथे आयोजित करण्यात आली होती. 

 या बैठकीसाठी प्रमुख उपस्थिती संजयजी कौडगे संघटनमंत्री मराठवाडा, नितिन भोसले संघटन सरचिटणीस, उस्मानाबाद ,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रदिप शिंदे यांची होती. यावेळी  संजयजी कौडगे यांनी संघटनात्मक आढावा घेऊन शक्ती केंद्र प्रमुख यांना मार्गदर्शन केले.

       यावेळी प्रदेश अल्पसंख्याक चिटणीस ॲड. जहीर चौधरी, जिल्हा चिटणीस ॲड.गणेश खरसडे, तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस ॲड.तानाजी वाघमारे, विकास कुलकर्णी, ता. सरचिटणीस विठ्ठल तिपाले, तानाजी पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अनिल पाटील, वैद्यकीय आघाडी तालुकाध्यक्ष डॉ.आनंद मोरे, साहेबराव पाडुळे,विठोबा मदने, निशिकांत क्षिरसागर, रमेश पवार, सतिष देवकर, श्रीराम देवकर, प्रमोद लिमकर, रामकृष्ण घोडके, मनोज पवार, सागर पाटील, शरद कोळी, युसुफ पठाण, दत्ता ठाकरे, कांतीलाल पाटील, श्रीकृष्ण शिंदे, सुभाष लटके, आप्पा मुसळे तसेच भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top