उस्मानाबाद येथे सरपंच परिषद राज्य विस्तार मेळावा संपन्न 


उस्मानाबाद/ प्रतिनिधी

सरपंचांना अनेक समस्या आहेत, गावस्तरावर प्रत्येक अडीअडचणीत सरपंचांना तोंड द्यावे लागते, या सरपंच परिषदेच्या माध्यमातून राज्यभरातील हजारो गावांची प्रतिनिधित्व केले जाणार आहे, आगामी काळात सरपंचांच्या मानधनाचा विषय विधानसभेत मांडून सरपंचांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत आमदार कैलास पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

जिल्हा परिषद उस्मानाबाद यशवंतराव सभागृह मध्ये दि.1 जुलै रोजी सरपंच परिषद राज्यस्तरीय विस्तार मेळावा संपन्न झाला कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थितीत कृषीदिनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष धीरज पाटील, धनेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक डॉ. प्रतापसिंह पाटील, प्रसिद्ध उद्योगपती प्रवीण रणबागुल, सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र भोसले, प्रदेश कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर वायाळ, सहसचिव सुशील तौर, राज्य कार्यकारिणी सदस्य संदीप देशमुख, कोहिनूर सय्यद,महिला प्रदेशाध्यक्ष सौ. झीनत सय्यद,जी.प.सदस्य संदिप मडके,उद्धव साळवी,मजूर फेडरेशन अध्यक्ष तात्यासाहेब गोरे,भूम पंचायत समिती उपसभापती बालाजी गुंजाळ, सावरगाव सरपंच रामेश्वर तोडकरी, तुळजापूर पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजी गायकवाड, जिल्हाध्यक्ष सुजीत हंगरगेकर आदींची उपस्थिती होती.

 
Top