तुळजापूर/ प्रतिनिधी-

 तालुक्यातील मंगरुळ येथील सोमनाथ महादेव माळगे (५०) यांची नोकरी गेल्याने नैराश्यातुन स्वताचा शेतातील आंब्याच्या झाडास दोरीने गळफास घेऊन सोमवार दि. २६ रोजी सकाळी ११ वाजता आत्महत्या केली. या घटनेने मंगरुळ परिसरात खळबळ उडाली आहे.

या बाबतीत अधिक माहीती अशी की, मंगरुळ (ता. तुळजापूर) येथील सोमनाथ महादेव माळगे हे श्रीतुळजाभवानी सहकारी साखर कारखाना लि. नळदुर्ग येथे नोकरीस होते. कारखाना बंद पडल्याने नोकरी गेली त्यांना दोन मुले होती शेती थोडीसी होती त्यातुन ही पिक हाती लागत नव्हते या नैराश्याच्या भरात त्यांनी सोमवार सकाळी स्वताच्या शेतात जावुन आंब्याच्या झाडास नायलोन दोरीने गळफास घेऊन आपली जीवानयाञा संपवली.

या प्रकरणी सिध्दैश्वर माळगे यांनी दिलेल्या फिर्याद वरुन तुळजापूर पोलिस ठाण्यात गुरंन 44/21 कलम 174 सीआरपीसीअन्वय गुन्हा नोंद करण्यात आला आहे.याचा अधिक तपास पोलिस कर्मचारी राऊत करीत आहेत.


 
Top