कळंब / प्रतिनिधी-

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील व जिल्हाध्यक्ष प्रा.सुरेश बिराजदार यांच्या आदेशानुसार कळंब तालुक्याच्या वतीने गॅस, डिझेल, पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ दि.२ जुलै रोजी दुपारी ३ च्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे इंधन दरवाढीच्या विरोधात घोषणाबाजी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उप विभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन दिले आहे. 

निवेदनात म्हटले आहे की,देशातील सर्व नागरिक हे कोरोनाच्या संकटाला तोंड देत आहेत त्यामुळे सामान्य लोक तर अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत आहेत.वर्षांपासूनच्या लॉकडाऊन मुळे लोकांच्या हाताला काम नाही तसेच बाजारपेठा ही उपलब्ध होत नाहीत.इंधन दरवाढीमुळे मशागतीचा खर्च वाढला आहे आणि हा वाढणारा खर्च सामान्य लोकांच्या खिशाला परवडणारा नाही त्यामुळे गॅस व इंधन दरवाढीला आळा घालण्यात यावा नाहीतर याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे .

 या दिलेल्या निवेदनात तालुकाध्यक्ष प्रा.श्रीधर भवर,प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा.डॉ.संजय कांबळे,जिल्हा उपाध्यक्ष महम्मद चाऊस,अँड.प्रविण यादव,तालुका उपाध्यक्ष सुरेश देशमुख,कार्याध्यक्ष सुरेश टेकाळे,कार्याध्यक्ष प्रा.शिवाजी लकडे,पंचायत समिती उपसभापती गुणवंत पवार,सदस्य आत्मलिंग झटाळ,नगर परिषद प्रभारी नगराध्यक्ष संजय मुंदडा,सागर मुंडे,सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष किरण मस्के,वक्ता प्रशिक्षण विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.तुषार वाघमारे,किसान सभेचे तालुकाध्यक्ष प्रकाश बावणे,अल्पसंख्याक महिला तालुकाध्यक्ष सलमा सौदागर,सामाजिक न्याय विभाग महिला जिल्हाध्यक्ष सुनंदा भोसले,तालुका प्रसिद्धी विभाग प्रमुख अविनाश घोडके,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष विठ्ठल कोकाटे,शहर अध्यक्ष रणजित खोसे,उपशहराध्यक्ष अजय जाधव,उपाध्यक्ष हुजेब बागवान,सचिव सौरव मुंडे,सरचिटणीस मनोज शिंदे,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भीमा हगारे,कार्याध्यक्ष अतुल धुमाळ,संघटक स्वप्निल चिलवंत, संदीप मोरे,अतिश पवार,सूर्यकांत लोमटे,संतोष पवार आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती .

 
Top