परांडा / प्रतिनिधी : - 

येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयातील गणित विभागाचे विभाग प्रमुख प्रा.विद्याधर नलवडे यांना नुकतीच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठात गणित विषयात पीएचडी प्रदान केली आहे. 

प्रा.विद्याधर नलवडे यांनी “स्टडी ऑफ बनाच कॉन्ट्रक्शन मॅपिंग प्रिन्सिपल अँड सम फिक्सड पॉईन्ट थेरम्स ईन मेट्रीक स्पेस “ या विषयावर आपला शोध प्रबंध सादर केला होता. त्यांना डॉ.यु. पी.डोलारे ज्ञानोपासक महाविद्यालय जिंतूर जिल्हा परभणी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. 

नलवडे यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये पीएच डी ही पदवी प्राप्त केली आहे. त्यांना मिळालेल्या पीएचडी पदवी मुळे श्री.भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर यांनी अभिनंदन केले.

तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.दीपा सावळे यांनी संस्थेच्या व महाविद्यालयाच्या वतीने शाल, श्रीपळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.  

यावेळी महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.शहाजी चंदनशिवे, आई क्यू ए सी चे समन्वयक डॉ.महेश कुमार माने ,परीक्षा प्रमुख डॉ. प्रशांत गायकवाड ,ग्रंथपाल डॉ.राहुल देशमुख, रसायनशास्त्राचे प्रा.जगन्नाथ माळी, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.अतुल हुंबे, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ.कृष्णा परभणे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.अरुण खर्डे, मराठीचे विभागाचे डॉ.गजेंद्र रंदिल ,वाणिज्य विभागाचे प्रा.संतोष काळे आणि वनस्पती विभागाचे प्रा.डॉ.सचिन चव्हाण आदी या वेळी उपस्थित होते.  

यावेळी प्रा.डॉ.विद्याधर नलवडे यांनी आपल्या पीएचडी चा प्रवास हा आपल्या आलेल्या अनुभवातून विस्तृत स्वरूपामध्ये व्यक्त केला.तर प्राचार्या डॉ.दीपा सावळे यांनी अध्यक्षीय समारोप करताना सांगितले की पीएचडी चा हा खडतर प्रवास प्रा.विद्याधर नलवडे यांनी  अनुभवला आहे.  त्यांनी सांगितले की कोणत्याही मार्गदर्शकाने आपल्या विद्यार्थ्यांना अगदी निस्वार्थपणे सहकार्य केले पाहिजे.आपण जो संशोधनाचा प्रबंध सादर करतो त्याचा समाजाला फायदा झाला पाहिजे डॉ. विद्याधर नलवडे यांनी पीएचडी च्या कालावधीमध्ये एकूण बारा रिसर्च पेपर प्रकाशित केले हे कौतुकास्पद आहे.असे त्यांनी यावेळी सांगितले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचलन व आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी केले. 

 
Top