तुळजापूर  / प्रतिनिधी-

महाराष्ट्र राज्यातील लोककलावंतांना मानधन लवकर मिळावे, या मागणीसाठी  महाराष्ट्राची कुलस्वामीनी  श्री तुळजाभवानी मातेस साकडे घालण्यासाठी नणंद (ता. निलंगा जि.  लातूर) येथुन राज्यव्यापी आराधी, गोंधळी, वाघ्या, शाहिर, भजनी परिषद वतीने  दंडवत यात्रेस २५ जुलै रोजी आरंभ झाला असुन या दंडवत याञेचा  सांगता तिर्थक्षेञ तुळजापूर  येथे राजेशहाजी महाध्दारासमोर  १ ऑगस्ट २०२१ रोजी  होणार आहे.

  महाराष्ट्र  राज्यव्यापी आराधी, गोंधळी, वाघ्या, शाहिर, भजनी परिषदेच्यानिमित्ताने  या दंडवत याञेचे आयोजन केले आहे.लोककलावंतांना मानधन लवकर  द्यावे, या मागणीकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी तसेच लोकाश्रय व राजाश्रय मिळावा म्हणून ही दंडवत यात्रा आयोजित केली आहे. 

३ ऑगस्ट २०२१ रोजी श्री क्षेत्र नणंद येथे महाप्रसाद कार्यक्रम आयोजित केला आहे, अशी माहिती राजेंद्र गायकवाड यांनी दिली. गोंधळी, वाघ्या, राज्यव्यापी आराधी, शाहीर, भजनी परिषद शाहीर, भजनी परिषद असेल, २५ जुलै रोजी नणंद,उद्घाटन अ. भा. गोंधळी समाज संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष राजेंद्र वनारसे यांच्या हस्ते झाले.होते याचा  समारोप राज्यव्यापी आराधी, गोंधळी, वाघ्या, शाहिर, भजनी परिषदेचे प्रांताध्यक्ष राजेंद्र गायकवाड (गोंधळी) यांच्या उपस्थितीत तिर्थक्षेञ तुळजापूर येथे होणार आहे.

नणंद ते तुळजापूरपर्यंत  दंडवत यात्रेचा प्रवास असा 

 शिवणी, मोगरगा, २६ जुलै रोजी लामजना, २७ जुलै रोजी तपसे चिंचोली, २८ जुलै रोजी पोमादेवी जवळगा, २९ जुलै रोजी माळकोंडजी, कवळी, वांगजी, ३० जुलै रोजी आशिव, उजनी, ३१ जुलै रोजी पाटोदा, करजखेडा, काक्रंबा, मार्ग तिर्थक्षेञ  तुळजापूर ला ही  १ ऑगस्ट रोजी पाहुचन देविस साकडे घातल्यानंतर  दंडवत यात्रेचा समारोप होणार आहे. 

 
Top