मुरुम / प्रतिनिधी

 जिल्हयात सक्षमपणे सामाजिक शांतता व सुव्यवस्था जोपासण्याचे, गुन्हाचा शोध घेण्याचे कार्य  जिल्हा पोलिस अधिक्षक  राज तिलक रौशन यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली होत आहे. त्याबद्ल त्यांचा मंगळवारी दि. २७ जुलै  रोजी उमरगा तालुक्यातील जवळगा बेट येथील ग्रामस्थांच्या वतीने प्रा. डॉ. श्रीकांत गायकवाड, उपसरपंच सचिन वाडीकर यांच्या हस्ते वैचारिक ग्रंथ देवून सत्कार करण्यात आला. 

यावेळी सरपंच लक्ष्मीबाई झाकडे, माजी सरपंच रामानंद मुकडे, सुरेश झाकडे, माजी सरपंच प्रभाकर बिराजदार, प्रभाकर गायकवाड आदींची उपस्थिती होती. यावेळी रौशन यांचे कार्य अत्यंत प्रभावशाली असल्यामुळे त्यांना केंद्रीय गृहखात्याचा मिडल फॉर एक्सलन्स इन इन्व्हेस्टीगेशन पुरस्कार, स्मार्ट पॉलिसिंगचा एफआयसीसीआय पुरस्कार, आयआयटी, खरगपूरचा यंग अँलूमणी अचिव्हमेंट पुरस्काराने गौरवित करण्यात आले आहे. त्यांचा दि गुड, दि बॅड आणि दि अननोन हा ग्रंथ गुन्ह्यांची मर्मग्राही मीमांसा करणारा आहे. ते खरगपूर येथून बी. टेक. व एम. टेक. असून २०१३ च्या बॅचचे आयपीएस आहेत. याप्रसंगी त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.


 
Top