तुळजापूर  / प्रतिनिधी-

तालुक्यातील आपसिंगा   येथील  एका तरुण  शेतकरी चंद्रकांत सुभाष गोरे यांचे कोरोनामुळे  मृत्यू झाल्याने त्यांचे  कुटुंबीय उघड्यावर आले होते. त्याच्या  कुंटुंबाला सावरण्यासाठी  रोटरी  क्लब तुळजापूर तर्फे त्यांच्या दोन लहान मुलांना शैक्षणिक वर्षासाठी दत्तक घेवुन त्याच्या  मुलीच्या   उज्ज्वल भविष्यासाठी 35 हजार रुपयांचा चेक देण्यात आला. हे पैसे जीवन सुकन्या योजनेसाठी गुंतवणूक करण्यात आले.  रोटरी अध्यक्ष रामचंद्र गिड्डे यांच्या हस्ते गावकरी समक्ष चेक देण्यात आला.

 यावेळी रो. अनिल रोचकरी , रो.धीरज क्षिरसागर , रो.सुनील क्षिरसागर आदी मान्यवर उपस्थित होते 

यावेळी चंद्रकांत गोरे यांचे शालेय जीवनातील इ.पहिली ते दहावी शिकणाऱ्या मित्र मंडळींनी पुढाकार घेऊन व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून निधी संकलन करण्यात आला.यासाठी एडवोकेट दिगंबर श्रीहरी भाकरे , राहुल तोडकरी,  सखाहरी गोरे,  दत्तात्रेय डांगे, एडवोकेट.गोकुळ गोरे ,बसवेश्वर खोचरे ,रघुनाथ क्षीररसागर,ज्ञानेश्वर तोडकरी , सचिन सरडे ,सुनील माळी राजकुमार सरडे, विनोद माळी , रवी घोडके, मारुती यल्लाळ, एपीआय कृष्णा गोरे ,छन्नू रोकडे, संजय क्षीरसागर ,विशाल कदम, खंडू क्षीरसागर, रमजान शेख, सुनील माळी यांचे मोलाचे सहकार्य लाभले व समस्त अपसिंगा येथील ग्रामस्थ दयानंद हाके यांनी रोटरी क्लबचे आभार मानले .यावेळी गावातील माजी सरपंच रामदास दादा गोरे, डॉ.श्रीहरी भाकरे, वनधिकारी नकाते साहेब व सुभाष गोरे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.


 
Top