उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

जिल्ह्यात दिनांक 01 ऑगस्ट 2021 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती हे उत्सव आहे. ही जयंती जिल्ह्यात शांततेत पार पडावा यासाठी वाहतुकीचे नियंत्रण व नियमन करणे आवश्यक आहे. यावेळी कोणताही अनुचित प्रकार न घडता कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी. तणावाची परिस्थिती निर्माण झाली तरी त्या परिस्थितीवर तात्काळ मात करता यावी म्हणून महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 36 प्रमाणे जिल्ह्यातील सर्व पोलिस उपनिरीक्षक व त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे पोलिस अधिकाऱ्यांना दिनांक 31 जुलै-2021 2021 रोजीचे 00.01 वा. ते दिनांक 01 ऑगस्ट 2021 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत अधिकार प्रदान करण्यात आले असेल्याचे पोलिस अधिक्षक राजतिलक रौशन म्हटले आहे. 

 रस्त्यांवरील किंवा रस्त्यांवरुन  जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे, त्यांची वर्तणूक किंवा वागणूक कशी ठेवावी या विषयी निर्देश देणे, अशा कोणत्याही मिरवणुका कोणत्या मार्गाने जाव्यात किंवा कोणत्या मार्गाने जावू नयेत ते मार्ग विहित करणे. सर्व मिरवणुकीच्या व जमावांच्या प्रसंगी प्रार्थनेच्या  वेळी व कोणत्याही रस्त्यावरुन किंवा सार्वजनिक जागी किंवा लोकांच्या एकत्र जमण्याच्या जागी, गर्दी होणार असेल किंवा अडथळा निर्माण होण्याची शक्यता असेल अशा सर्व ठिकाणी अडथळा होवू न देणे, ही जबाबदारी या अधिकाऱ्यांनी पार पाडावयाची आहे.

 सक्षम अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियमाच्या कलम 33, 34, 37 ते 41 या कलमान्वये केलेल्या कोणत्याही नियमनात्मक आदेशांचे अधिन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देणे आवश्यक आहे. जो कोणी नियमनात्मक आदेशांचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन करेल तो महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 134 प्रमाणे शिक्षेस पात्र राहिल, असेही जिल्हा पोलिस अधीक्षक राजतिलक रौशन यांनी याबाबतच्या आदेशात म्हटले आहे.    


 
Top