परंडा / प्रतिनिधी -

 बी.एस.सी पात्र पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी मंजूर करून मंजूरी आदेश निर्गमित करावेत याविषयीचे निवेदन शुक्रवार दि.२ जुलै रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता यांना देण्यात आले.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांचे शासन परिपत्रक क्र.वेतन १२१६/प्र.क्र.१२३/१६/टीएनटी-३ दिनांक १३ ऑक्टो.२०१६ च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार शिक्षण विभाग प्राथमिक अंतर्गत इ.६ वी ते इ.८ वी या वर्गांना शिकवणा-या शिक्षकांपैकी १/३ शिक्षकांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदवीधर वेतन श्रेणी मंजूर करण्या बाबत शासन निर्देश आहेत.

प्राथमिक शिक्षण विभागाकडे ३७ प्रस्ताव विज्ञान/गणित पदवीधर शिक्षक वेतन श्रेणी मंजूरीसाठी सादर केलेले आहेत.संबंधित पात्र पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी मंजूर करून मंजूरी आदेश निर्गमित करावेत ही मुख्य मागणी निवेदनात केली आहे.

सदरील निवेदनावर प्रहार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना राज्य समन्वयक दत्तात्रय पुरी, जिल्हाध्यक्ष वैजीनाथ सावंत, जिल्हा कार्याध्यक्ष विशाल अंधारे, जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत माने, जिल्हा नेते संतूक कडमपल्ले आदि पदाधिकाऱ्यांचे स्वाक्षऱ्याआहेत.


 
Top