उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्हा तेली समाज संघटनेच्या वतीने कोरोना आजाराने समाजातील कुटुंबावर ओढावलेल्या संकट व मृत्युपावलेल्या कुटुंबांना आधार देण्यासाठी पुढील आठवड्यात मंगळवार दिनांक 06 जुलै रोजी जिल्हा दौरा करण्यात येणार आहे.

दरम्यान अखिल भारतीय तैलिक शाहु महासभा नवी दिल्ली यांचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त आण्णा क्षिरसागर यांच्या मार्गदर्शानाखाली प्रदेश कार्यकारणी सदस्य पदि लक्ष्मण निर्मळे तर उस्मानाबाद जिल्हा युवक अध्यक्षपदी शशिकांत बेगमपुरे तर जेष्ठ नागरीकांचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत मेंगले,शहराध्यक्ष शिवलिंग होनखांबे,तसेच युवक जिल्हा सचिव संतोष क्षिरसागर,युवक सहसचिव नागेश निर्मळे,युवक शहराध्यक्ष जितेंद्र घोडके,युवक शहर सचिव गणेश घोडके,यांच्या निवडी बद्दल उस्मानाबाद जिल्हा तेली समाज संघटनेच्या वतीने हार शाल फेटा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर,जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ घोडके,जिल्हा कोषाध्यक्ष महादेव मेंगले,उस्मानाबाद तालुकाध्यक्ष दत्तात्रय बेगमपुरे,संचालक रमेश साखरे,प्राचार्य  डॉ अनिल देशमाने,प्रा.चंद्रशेखर राऊत,परमेश्वर राऊत आदिंची उपस्थिती होती.


 
Top