तुळजापूर / प्रतिनिधी - 

श्रीतुळजाभवानी मातेस मुल होण्यासाठी नवस बोलला असता  दोन जुळे मुले होवुन नवसपुर्ण झाल्याने पुणे येथील भक्ताने प्रत्येक मुलाचे 1100 प्रमाणे   दोन जुळ्या मुलाचे  2200 श्रीफळ (नारळ )श्रीतुळजाभवानी चरणी शुक्रवार दि.९ रोजी श्रीतुळजाभवानी चरणी अर्पण करून नवसपुर्ती केली. 

  श्री तुळजाभवानी मातेस सकाळीअभिषेक पुजा झाल्यानंतर देविजीस  वस्ञोलंकार घालण्यात आल्यानंतर श्रीतुळजाभवानी मातेच्या मुख्य सिंहासनावर पुजारी सुधीर शहाजी अमृतराव कदम यांच्या माध्यमातून हे नारळ अर्पण केले. व या दाम्पत्यांनी व जुळ्या बाळांनी  देविंजींचा मुख्यगर्भगृहातील शिखराचे दर्शन घेवुन देवीचरणी नवस पुर्ती झाल्याचे समाधान मानून गावी रवाना झाले. 

 
Top