उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्या सूचनेनुसार  उस्मानाबाद, भुम ,वाशी आणि परंडा येथुन “ मदतीचा हात” या मुहिमेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कोकण आणि अतिवृष्टी झालेल्या भागात मदत  पाठविण्यात येत आहे. 

सौ.वैशालीताई मोटे आणि जिल्हा कार्याध्यक्ष सौ. मनिषा पाटील यांनी जीवनावश्यक वस्तु- फरसाण, मॅगी, पेस्ट, टुथब्रश, बिस्कीट, साबण, मचछरांपासुन बचावासाठी फास्ट कार्ड ई. वस्तु असलेल्या 100 किट तसेच भुम ,परंडा आणि वाशी महिला आघाडी च्या वतीने प्रत्येकी 25 किट याप्रमाणे 75 किट  मदत कार्यासाठी उस्मानाबाद हुन बीड कडे महिला निरीक्षक सौ प्रज्ञाताई खोसरे यांच्या कडे रवाना करण्यात आल्या .

यावेळेस सौ मनिषा पाटील, यशस्विनी सामाजिक अभियान च्या तालुका समन्वयक सौ मंजुषा खळदकर, भाग्यश्री तनमोर, संगिता कोळगे, प्रतिक्षा जाधव, राजनंदिनी जाधव, नंदा जाधव ई उपस्थित होत्या.

 
Top