उस्मानाबाद / प्रतिनिधी-

आधीच नागरिक कोरोना महामारीच्या संकटाचा मुकाबला करत असताना अतिवृष्टी आणि पुराने कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात हाहाकार माजवला आहे. अनेक गावे पाण्याखाली गेली, तर दरडी कोसळून घरे उध्वस्त झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे या भागातील जनतेला दिलासा देण्यासाठी उस्मानाबाद येथील अंजुमन हेल्थकेअर सोसायटीच्या वतीने मदतीचा हात पुढे केला आहे. 

 कोकण पुरग्रस्तासाठी  दि.२८/०७/२०२१ जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. यात पाणी बॉटल्स, बिस्किट्स, ब्रेड, टोस्ट यासह खाद्यपदार्थ  वाहनांतून रवाना करण्यात आले.

अंजुमन सोसायटी ही आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे.  परंतु सध्याच्या परिस्थितीत उदभवलेल्या  पूरस्थितीमुळे कोकणातील बहुतांश भाग बाधित झाल्यामुळें या संकट काळात  पूरग्रस्त भागातील लोकांना दिलासा देण्यासाठी खाद्य पदार्थांची मदत अंजुमन सोसायटीतर्फे देण्यात आली. 

यावेळी अंजुमन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष फेरोज पल्ला, माजी नगरसेवक आयाज शेख, सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे, सदस्य वसीम शेख, शहानवाज सय्यद, ईम्तियाज बागवान, अर्शद सय्यद, सिद्दिक कोतवाल, अल्ताफ शेख, इमरान सय्यद आदी उपस्थित होते.

 
Top