तुळजापूर  / प्रतिनिधी-  

तालुक्यातील मंगरुळ गावातील लबडे वस्तीतुन जाणाऱ्या जिल्हा मार्ग ४१ हे रस्ते काम करताना पाणी निचरा नियोजन न केल्याने यारस्तावर सध्या पाणी साचुन रस्ता दिवसेंदिवस खराब होत असल्याने यारस्तावरील पाणी निचरा होण्यासाठी दोन्ही बाजुला नाली करण्याची मागणी या भागातील ग्रामस्थांन मधुन केली जात आहे,

तुळजापूर तालुक्यात अनेक रस्ते काम करताना नियोजन पुर्वक न केले गेल्याने याचा फटका प्रामुख्याने हजारो  ग्रामस्थांना बसत आहे. तुळजापूर तालुक्यात मंगरुळ गावातुन प्रमुख असा जिल्हा मार्ग मंगरुळ गावातुन जातो हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.सदरील रस्ता मंगरुळ गावातील लबडे वस्तीतुन जातो या रस्त्यावर वाहने व नागरीकांची मोठी वर्दळ असुन शालैय विध्यार्थी याच रस्त्यावरून शाळेत येजा करतात या रस्त्यावर येणारे पाणी निचरा होण्यास कुठलीही उपाययोजना न करता हा रस्ता ऐकवर्षा पुर्वी  तयार केल्याने आज पावसाळ्यात या रस्त्यावर पाणी थांबत असुन ग्रामस्थिंना मार्गक्रमण करताना गैरसोयीस सामोरे जावे लागत असुन अधिक काळ पाणी थांबत असल्याने दुर्गधी व आरोग्य संबंधित समस्या निर्माण होत आहे.

याचा ञास या भागातील ग्रामस्थांना होत आहे,तरी या रस्तावर  दोन्ही बाजूला बंदीस्त सिमेंट नाली करुन या भागातील ग्रामस्थांना दिलासा देण्याची मागणी होत आहे

 
Top