तुळजापूर  / प्रतिनिधी-  

 येथील भीमनगर सिध्दार्थ नगर भागात लसीकरण मोहिम राबविण्याची मागणी नगरसेविका हेमा औदुंबर कदम यांनी  उपजिल्हारुग्णालय वैद्यकीय अधिकारी यांना निवेदन देवून केली आहे.

निवेदनात म्हटलं आहे की, देशभरात थैमान घातलेल्या कोव्हीड -19 साथरोग प्रतिबंधाच्या अनुषंगाने आपल्या मार्फत आयोजीत लसीकरण मोहिमेअंतर्गत तुळजापुर शहरातील भिम नगर व सिध्दार्थ नगर येथील मागासवर्गीय , गोरगरीब व वंचीत घटक हे मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करणारे व अशिक्षित असल्याकारणाने सदर भागातील नागरीकांना भ्रमणध्वणी ( मोबाईल ) वरुन सदर लसीकरण मोहिमत भाग घेता येत नाही त्यामुळे सदरील भागातील नागरीकांना काव्हीड -19 प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमपासुन वंचित असून सदरील भागातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले असुन , सदरील भागात कोरोना साथरोग पसरण्याची भिती नाकारता येत नाही . त्याअनुषंगाने नगर व सिध्दार्थ नगर भागात  ऑन स्पॉट ( ऑफ लाईन ) लसीकरण कम्प आयोजीत करुन नागरीकांना दिलासा द्यावा असे निवेदनात म्हटलं आहे.

 
Top