उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 बुथ संरचना हा पक्ष संघटनावाडीचा महत्त्वपुर्ण पाया आहे आणि बुथ प्रमुख हा भाजपा संघटनेचा आत्मा आहे, अशा प्रकारचे प्रतिपादन मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे यांनी केले. त्यानंतर त्यांनी  तसेच जिल्हयातील सर्व मंडल अध्यक्ष तसेच बुथ संयोजक आणि बुथ प्रभारी यांच्याकडुन शक्तीकेंद्र आणि बुथ संरचने बद्दल माहीती घेतली.

भारतीय जनता पार्टीची जिल्हास्तरीय जिल्हा कार्यकारिणी बैठक प्रतिष्ठान भवन भाजपा कार्यालय उस्मानाबाद येथे जिल्हा कार्यकारीनी बैठक मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.  दि.30 जुन 2021 रोजी दुपारी 1 वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 

या जिल्हा कार्यकारीनी बैठकीस जिल्हा भरातील सर्व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला कोरोना मध्ये मयत पावलेल्या व्यक्तींना श्रध्दांजली वाहून बैठकीची सुरुवात करण्यात आली. तसेच प्रदिप शिंदे यांनी जिल्हयातील बुथ संर्पक प्रमुख गठन आणि शक्तीकेंद्र तसेच बुथ संरचनेची माहीती दिली. तसेच बैठकीत शेती विषयक ठरावाची माहीती देत असतांना नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या अनेक लाभदायक योजनांची माहीती नेताजी पाटील यांनी दिली. तसेच किसान मोर्चाचे संजय पाटील यांनी अनुमोदन केले. त्यानंतर माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी राजकीय ठराव याबद्दल माहीती दिली आणि कोरोना महासाथीच्या बाबतीत महाविकास आघाडी सरकार पुर्णपणे अपयशी ठरल्याचे सांगीतले. तसेच पांडूरंग पवार यांनी सोशल मिडीया आणि सक्रीयता या बद्दल माहीती दिली. हे सरकार कोरोनाच्या बाबतीत पुर्णपणे अपयशी ठरल्याचे ही सांगीतले. खंडेराव चौरे यांनी ही बैठकीस अनुमोदन केले. या दोन्ही ठरावास उपस्थित जिल्हा कार्यकारनी सदस्यांनी एकमताने सहमती दर्शवली.

भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे हे बैठकीस मार्गदर्शन करत असतांना म्हणाले की, पश्चीम बंगाल सारख्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे फक्त ३ आमदार होते. त्या ठिकाणी बुथ प्रमुख पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या संघटनात्मक कार्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कनखर नेतृत्वाखाली ३ आमदारांचे 76 आमदार झाले. त्यामुळे बुथ संरचना ही पक्ष बांधणीसाठी अत्यंत महत्वाचा मुद्दा असल्याचेही सांगीतले. 

या संपुर्ण बैठकीचे सुत्रसंचलन जिल्हा सरचिटणीस नितीन भोसले यांनी केले. तसेच या बैठकीस प्र.का.स. सतीष दंडनाईक, माजी नगराध्यक्ष सुनील काकडे, किसान मोर्चाचे रामदास कोळगे, भटकेविमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष सिताराम वनवे, भाजपा युवा मोर्चाजिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजय ‍ शिंगाडे, सर्व तालुका अध्यक्ष सरचिटणीस तसेच जिल्हा भरातील असंख्य पदाधिकारी उपस्थीत होते.

 
Top