उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक राहिलेले श्री.विठ्ठलराव जाधव यांनी तयार केलेल्या “शांतीदूत परीवार” च्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदी युवराज नळे यांची नियुक्ती केली आहे.

  “शांतीदूत परीवार” ही मातृसंस्था असून या अंतर्गत विविध बावीस संस्था कार्यरत आहेत व त्या मार्फत राज्यभरात सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कृषी, क्रीडा,अशा विविध क्षेत्रात कार्य केले जाते.युवराज नळे यांच्या विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन “शांतीदूत परीवार” च्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आल्याबद्दल त्यांचे अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.


 
Top