परंडा / प्रतिनिधी :-

तालुक्यातील मौजे भोंजा हवेली येथे कृषी विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान नम्रता गटातील श्रीमती रंजना गोवर्धन मदणे यांचा विकेल ते पिकेल अंतर्गत संत सावता माळी रयत बाजार अभियान शेतकरी ते थेट ग्राहक विक्री.   या अभियान दरम्यान गावतील शेतकरी व गटांच्या पोषण बाग मधील विविध शेंद्रिय फळभाज्याचां कुटुंबांना होणार थेट लाभ तसेच रंजना मदणे यांच्या कुटुंबाला गटाच्या माध्यमातून चांगलाच हातभार लागत आहे. 

हा उपक्रम HDFC बँकेचे एस ओ अधिकारी यांना ही हा उपक्रम आवडला विकेल ते पिकेल अभियान करीता कृषी अधिकारी महारूद्र मोरे, कृ.अ.नलवडे व्ही.डी, म.अ.के देवकर, म.अ.एम. आर.तावरे, आत्मा चे व्यवस्थापक पाटील ए.यांच्या मार्गदर्शनाखाली स्टाॅल करीता प्रधानमंञी यांच्या विशेष योजना मधून वितरण करण्यात आले यावेळी ग्रामसेवक मनोज काशीद, उमेद चे लघुउद्योग सल्लागार गणेश नेटके, HDFC बँके चे  SO अनिल किडे, किरण आंबेकर, गुरूदास नेटके, शिवश्री नवनाथ नेटके, अरूण कोळी, गोवर्धन मदणे, कैलास भांदुर्गे, शिध्देश्वर मोरे, बाळासाहेब काशीद, सनी गाडे व नम्रता गटातील महिला आदी उपस्थित होत्या.


 
Top