कळबं / प्रतिनिधी 

 कोरोणा विषाणूंचा प्रादुर्भाव यामुळे अनेक व्यवसाय संकटात आले आहेत याच धर्तीवर महामंडळाने किमान सर्व काही सुरुळीत होईपर्यत चे  भाडे माफ करून त्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी कळंब च्या  सर्व अस्थापना धारकांनी आगार प्रमुख मुकेश कोमटवार यांच्या मार्फत विभाग नियंत्रक व परिवहन मंत्री यांना निवेदन देऊन केली आहे.

कोरणा विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात  राज्य शासनाने  लॉकडाऊन केला होता. या लॉकडाऊन मुळे सर्वच घटकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. शासन आणि काही खाजगी घटक देखील मदतीला धावले आहेत मात्र बसस्थानकातील भाड्याने दुकाने असलेल्या परिवहन महामंडळाला काहीच सवलत दिली नसल्याने प्रश्न  निर्माण झाला आहे.  राज्य शासनाने मागील लॉकडाउन काळातील व चालू लॉकडाऊन काळात राज्यमार्ग परिवहन महामंडळाने या धर्तीवर पूर्ण लॉकडाउन काळातील  एप्रिल, मे, जून २०२१ या तीन  महिन्याचे भाडे दुकानदाराचे माफ करावे अशी मागणी सर्व अस्थापनाधारकातू आगार प्रमुख मुकेश कोमटवार यांच्चा कडे निवेदन देउन केली आहे.  

 परिवहन महामंडळाच्या बस स्थानकात अनेक भाडेकरू आहेत व्यवसायिक आहेत सरकार व रापम  महामंडळाने आपली भूमिका काय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परिवहन महामंडळाच्या प्रत्येक  स्थानकात रसवंती, बेकरी, फळाचे दुकाने, स्टेशनरी ,पुस्तक दुकान, वृत्तपत्र विक्रेता, सलून ,दूरध्वनी कक्ष, आईस्क्रीम सेंटर ,ब्युटीपार्लर ,अशा अनेक असंख्य दुकाने या  सुरू झाली होती पण या रोगामुळे अनेक धंदे प्रवाशी संख्या घटत असल्याने ते भुईसपाट होण्याच्या मार्गावर आहेत.  उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये या दुकानांची संख्या जवळपास चारशेच्या पार आहे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उमरगा ,लोहारा, तुळजापूर ,कळबं, उस्मानाबाद,भूम, परांडा, अशा अनेक बसस्थानकावर छोटे-मोठे व्यवसायिक आपला धंदा करून आपले पोटपाणी भागवत आहे .या कोरोणा विषाणूंचा प्रादुर्भाव यामुळे अनेक व्यवसाय संकटात आले आहेत याच धर्तीवर महामंडळाने किमान सर्व काही सुरुळीत होईपर्यत चे  भाडे माफ करून त्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी कळंब च्या  सर्व अस्थापना धारकांनी आगार प्रमुख मुकेश कोमटवार यांच्या मार्फत विभाग नियंत्रक व परिवहन मंत्री यांना निवेदन देऊन केली आहे. 

या निवेदनावर ,दिलीप चाळक,विलास मुळीक,दत्तात्र्य उमाप,हरिष धम्मावत,बब्रुवान शिंदे,सोमनाथ सुरवसे,करीम पठान आदीच्या सह्या आहेत.

 
Top