तुळजापूर  / प्रतिनिधी-

 तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरून नेलेल्या शेळ्यांपैकी चार शेळ्या पोलिसांनी हस्तगत करून याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे.

जळकोट येथे ९ जुलै रोजी अंधाराचा व पावसाचा फायदा घेऊन आरोपी बाळू वसंत, सावंत जळकोट, रावसाहेब शेषराव कदम जळकोट, शफी महेबुब शेख हंगरगा (नळ ) या तिघांनी पहाटे पाचच्या दरम्यान फिर्यादी संतोष दिलीप सुरवसे जळकोट यांच्या गावालगत असलेल्या पत्र्याच्या शेडमधून लहान-मोठया मिळून १० शेळ्या चोरून नेल्या होत्या. जवळपास पंधरा दिवसानंतर पोलिसांनी आरोपीस पकडून ४ शेळ्या हस्तगत केल्या. त्यांना तुळजापूर न्यायालयात हजर केले असता ३१ जुलैपर्यंत आरोपींना पोलिस कस्टडी देण्यात आली आहे. याचा अधिक तपास पोलिस हवालदार नवनाथ बांगर हे करीत आहेत. परिसरात महिनाभरापासून चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. आरोपींकडून अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


 
Top