उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

उस्मानाबाद जिल्हयातील केकस्थळवाडी येथील रहिवाशी तथा राष्ट्रवादीचे शाखाध्यक्ष भगिरथ अंबऋर्षी कावळे यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते रविवार दि. २५ जुलै रोजी भाजपा प्रतिष्ठाण भवन येथे प्रवेश केला. 

दरम्यान राष्ट्रवादी शाखाध्यक्ष म्हणून भगिरथ  कावळे यांनी गेली १५ वर्ष सक्रिय कार्य करून परिसरात आपल्या कामाची छाप सोडली होती. कावळे यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेश कार्यक्रमास भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, प्रदेशाध्यक्ष अॅड. खंडेराव चौरे व भाजपा कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. भगिरथ कावळे यांच्या प्रवेशानंतर त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. 


 
Top