उस्मानाबाद / प्रतिनिधी

येथे रोटरी क्लबच्या वतीने रोटरी नेत्र रुग्णालयाच्या परिसरात केशर आंबा झाडांची लागवड व १५० तुळशी रोपांचे वितरण जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांच्या हस्ते करण्यात आले. उस्मानाबाद येथे रोटरी क्लब च्या नेत्र रुग्णालय परिसरात सोमवारी (दि.५) हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरीचे प्रांत उपपाल रवींद्र साळुंखे तर रोटरी सेवा ट्रस्टचे सचिव प्रमोद दंडवते, रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री गरजे, सचिव कुणाल गांधी, माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, सचिव रोटरी क्लब उस्मानाबाद व रोटरी सेवा ट्रस्ट उस्मानाबाद यांच्या वतीने आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.

 या कार्यक्रमासाठी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस संतोष जाधव, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सचिन देशमुख, डॉ. अभय शहापूरकर, इंद्रजित आखाडे, संतोष शेटे, डॉ. श्रीराम जिंतुरकर, डॉ. मीना जिंतुरकर, डॉ. अनार साळुंके, दमयंती साळवी, बाळासाहेब देशमुख, प्रदीप मुंडे, सुधाकर भोसले, चित्रसेन राजेनिंबाळकर, आबा खंदारे, नितीन तावडे, नारायण गाडे, अभिजित पवार, पांडुरंग काळे, अतुल अजमेरा, राजू अजमेरा, महेंद्र देशमुख, हेमंत पांडे यांची उपस्थिती होती. 


 
Top