तुळजापूर / प्रतिनिधी-

 केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशात महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल, गॅस सिलिंडरच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. महागाईमुळे सामान्य जनतेचे जगणे असहाय्य झाले आहे. महागाई विरोधात केंद्र सरकारला जागे करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने रस्त्यावर उतरत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. तुळजापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. क्रांती चौक मार्गे तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.


 
Top