उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र  पवार यांच्याबद्दल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्याने बेताल वक्तव्य करत आहेत.तसेच जाती -जाती मध्ये तेड निर्माण होईल,असे वक्तव्य करत आहेत.त्यांच्या या वक्तव्यामुळे समाजातील पुरोगामी विचारांच्या घटकांच्या भावनांचा अनादर होत असून भावना दुखावल्या जात आहेत. म्हणून सभापती यांनी विधान परिषदेचे सदस्य भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करून आमदारकी रद्द करावी.,अशा मागणीचे निवेदन दि.६ जुलै रोजी रामराजे नाईक निंबाळकर,सभापती विधान परिषद यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे यांनी दिले आहे .

 दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह आहे.समाजातील विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींनाच लोक प्रतिनिधीत्व देण्याचे सभागृह आहे.विधान परिषदेतील सदस्यांना न शोभणारे वक्तव्य करून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे सभागृहाचा व जनतेचा अवमान करत आहेत. अशा अवमानकारक व न शोभणारे वक्तव्यांचा,कृतींचा व विकृत वृत्तीचे असणारे भाजपचे आमदारांचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करत आहे.तरी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे विधान हे विधान परिषद सदस्य पदाला न शोभणारे असून त्यांचे सदस्यत्व रद्द करावे अशी विनंतीवजा मागणी करण्यात आली आहे.

याप्रसंगी युवक जिल्हाध्यक्ष आदित्य भैय्या गोरे,अमोल भैय्या सुरवसे, जिल्हा सचिव गाउस तांबोळी,कार्याध्यक्ष उमेश मडके, तालुका सचिव समाधान बाराते,शहर अध्यक्ष सनी पवार , शहर उपाध्यक्ष जैनउद्दीन शेख,कार्याध्यक्ष रॉबिन बगाडे,अनिल अडतराव राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

 
Top