उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या सदस्या तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्षा कु.सक्षणाताई सलगर यांना काही गावगुंडांनी शनिवार दि.३ जुलै रोजी संध्याकाळी ६ वाजून १४ मिनिटांनी फोनवर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून धमकी दिली आहे या घटनेचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी उस्मानाबाद जिल्हाच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.

दि.६ जुलै रोजी पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सदरील व्यक्तींनी गोपीचंद पडळकरांचे कार्यकर्ते आहोत असाही उल्लेख केला आहे. एका महिला/मुलींना अपमानास्पद व लज्जास्पद बोलणे हा गुन्हा असून सदर व्यक्ती विरोधात कठोरात कठोर कार्यवाही करून एक चांगला सामाजिक पायंडा घालावा तसेच तपास यंत्रणेमार्फत ह्या घटनेमध्ये सहभागी असणाऱ्या दोषीं विरोधात गुन्हे दाखल करावे अशी मागणी करण्यात आली आहे.

हे निवेदन देताना युवक जिल्हाध्यक्ष आदित्य भैय्या गोरे,अमोल भैय्या सुरवसे,जिल्हा सचिव गाउस तांबोळी,कार्याध्यक्ष उमेश मडके, तालुका सचिव समाधान बाराते,शहर अध्यक्ष सनी पवार ,शहर उपाध्यक्ष जैनउद्दीन शेख,कार्याध्यक्ष रॉबिन बगाडे,अनिल अडतराव राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

 
Top