उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य   सुधीर   पाटील यांनी देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त उस्मानाबाद मध्ये विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला यामध्ये सकाळी 11 वाजता वृक्षारोपण करण्यात आले 11.30 गरजू लोकांपर्यंत त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना दोन वेळचे डबे देण्यात आले त्याचबरोबर दुपारी 12 अन्नपूर्णा बहुउद्देशीय संस्थेकडे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या समोर दोन दिवस सकाळ-संध्याकाळ जेवणाची व्यवस्था केली व 12.30 वाजता अत्यंत गरजवंतांना किराणा किटचे वाटप करण्यात आले दुपारी 1 वाजता उस्मानाबाद  नगर पालिकेतील सफाई कामगार विभागातील सर्व कर्मचारी सेवक ज्यांना आपण कोरोना योद्धा  म्हणतो त्यांचा सत्कार 

 खऱ्या अर्थाने वॉरियर या शब्दाप्रमाणे या सर्व लोकांनी गेल्या सव्वा वर्ष झाले काम केले आहे कोरोणामुळे मयत झालेल्या लोकांचे अंत्यविधी अंत्यसंस्कार या लोकांनी केले त्या काळामध्ये मयत झालेल्या लोकांचे सगेसोयरे नातेवाईक देखील जवळ येत नव्हते पण नगरपालिकेच्या सर्व सफाई कामगार टीमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे या सर्व लोकांनी जीवाची बाजी लावून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या सर्व  मरण पावलेल्या लोकांचे अंत्यविधी त्यांच्या त्यांच्या धर्माप्रमाणे अतिशय चांगले रित्या केले आहेत. आशा सर्व लोकांचा सत्कार धाराशिव तुळजापूर विधानसभेचे आमदार  राणाजगजितसिंह पाटील  जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे  , भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सुधीर  पाटील  यांच्याकडून सर्वांचे 20 जणांचे सत्कार करण्यात आला या सत्कार मध्ये सर्वांना भर पेरवा आहेर शाल श्रीफळ ट्रॉफी देऊन करण्यात आला   

 या कार्यक्रमासाठी राजसिंहराजे निंबाळकर, सौ प्रेमाताई पाटील, प्रवीण जी पाठक, अभिराम पाटील  तसेच श्रीपतराव भोसले स्कूलचे उपमुख्याध्यापक सिद्धेश्वर कोळी उपप्राचार्य संतोष घार्गे सर कम्प्युटर सायन्स चे प्राचार्य डॉ. अजित मसलेकर, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. गजानन वाले, फार्मसी कॉलेज चे प्राचार्य डॉ.अमोल जोशी सर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नंदकुमार नन्नवरे सर यांनी केले  त्याचबरोबर सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी वृंद उपस्थित होते

 
Top