उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी गडचिरोली येथे सहायक जिल्हाधिकारी व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत असलेले राहुल गुप्ता यांची नियुक्ती झाली आहे.

डॉ. फड यांची मराठवाडा वैधानिक विकास महामडळांच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. फड यांनी कोरोना कालावधीत पदभार स्वीकारला होता. या काळात त्यांनी आरोग्य सेवा उत्तम प्रकारे अबाधित ठेवली. ग्रामीण भागातील कोविड सेंटरला भेट देऊन तेथील व्यवस्थापनाला मार्गदर्शन केले.

त्यांनी जिल्ह्यात सुंदर माझे कार्यालय अभियान उत्तमप्रकारे राबवले. त्यांनी जिल्हा परिषद मुख्यालयासह जिल्हातील विविध अन्य कार्यालये, शाळा, अंगणवाड्यांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यांच्या जागी राहुल गुप्ता यांची नियुक्ती झाली आहे. गुप्ता हे गडचिरोली येथे सहाय्यक जिल्हाधिकारी व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होते.

 
Top